24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeधाराशिवतुळजाभवानीच्या दशर्नासाठी भाविकांची गर्दी वाढली

तुळजाभवानीच्या दशर्नासाठी भाविकांची गर्दी वाढली

तुळजापूर : प्रतिनिधी
नाताळ व सलग आलेल्या सुट्टयामुळे श्रीक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तुळजाभवानी मंदीर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. शनिवार, रविवार सलग सुट्ट्या व सोमवारी नाताळ निमित्त सुट्टी असल्याने अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने श्री तुळजाभवानी देवीच्या दशर्नार्थ भाविकांचा प्रचंड ओघ प्रचंड वाढला आहे रविवारी तर मंदिर परिसर व तुळजापूर शहरातील सर्वच रस्त्यावर भाविक दिसत होते. रविवारी दि. २४ डिसेंबर रोजी जवळपास दीड लाखांवर भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे.

तुळजाभवानीच्या दशर्नासाठी राज्याच्या कानाकोप-यातून भाविक दाखल होतात. याशिवाय लगतच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून ही भाविक मोठ्या संख्येने येतात. शनिवारी, रविवारी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने आल्याने तुळजापूर शहरातील वाहनतळे हाऊसफुल्ल झाले होते. वाढती गर्दी पाहता पार्किंग हाऊसफुल्ल झाल्याने बहूतांश वाहने रस्त्याच्या बाजूला दुतर्फा लावली होती. तुळजाभवानीचे भाविक दशर्नानंतर प्रासादिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्र्दी करत होते. त्यामुळे भाविकांनी बाजारपेठ गजबजुन गेली होती. रात्री नऊ वाजेपर्यंत तुळजाभवानी मंदीरात भाविकांचा दशर्नासाठी ओघ सुरुच होता.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR