26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रफळपिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत वाढवली

फळपिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत वाढवली

योजनेत सहभागी होण्याचे कृषिमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : शेतक-यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रबी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा भरण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्यात आली आहे. शेतक-यांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी पीक विमा पोर्टल दिनांक ४ व ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू राहणार आहेत. कोकणातील आंबा, काजू, संत्रा, रबी ज्वारी या पिकांसाठी पीक विमा योजनेत भाग घेण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ होती. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.

फळपिकांचा पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ही ३० नोव्हेंबर होती. मात्र काही शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा भरू शकले नाहीत, याचा विचार करून केंद्राकडे विनंती केली होती. त्यानंतर यामध्ये वाढ करण्यात आली असून दिनांक ४ आणि ५ डिसेंबर या दोन दिवसांत वरील पिकांचा विमा भरता येणार आहे. उर्वरित शेतक-यांनी आपल्या पिकांचा विमा भरून या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतक-यांना दिलासा
पीक विमा पोर्टलमधील काही समस्यांमुळे विमा योजनेत भाग घेऊ शकणारे इच्छुक शेतकरी योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले होते. मात्र, आता मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतक-यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. त्यांना भाग घेण्याची संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. आता दिनांक चार व पाच डिसेंबर २०२३ असे दोन अतिरिक्त (वाढीव ) दिवस पीक विमा पोर्टल या पिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शासनाने हवामानावर आधारित फळपीक योजना सुरू केली आहे. या अंतर्गत आंबा, काजू, केळी या फळपिकांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR