22.6 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रआता ‘मन मन मोदी’ असा निकाल

आता ‘मन मन मोदी’ असा निकाल

मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर : मुख्यमंत्री

मुंबई : कर्नाटक आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाहीत, त्यामुळे येत्या काळात जनतासुद्धा काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. ‘घर घर मोदी’ म्हटले जायचे पण आता ‘मन मन मोदी’ असे निकाल लागलेत, मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मोदींचा करिष्मा संपला असे काही लोक म्हणत होते. मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जनतेने या निवडणुकांमध्ये मोदींना साथ दिली. मोदींचा करिष्मा, लोकांमध्ये असलेली लोकप्रियता ते लोकप्रियतेत एक नंबरवर आहेत हे पुन्हा सिद्ध झाले. राहुल गांधींनी परदेशात देशाला बदनाम केले. मोदींना हरवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली आहे.

नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेले काम आणि अमित शहा यांनी केलेल्या नियोजनामुळे एनडीएला मोठे यश मिळाले आहे. घर घर मोदी… मन मन मोदी असा निकाल आपण पाहिला. हा निकाल जनतेच्या हातात असतो, आणि जनतेने मोदींना साथ दिली. मोदी जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR