रायगड : प्रतिनिधी
रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत दोन दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल, असे सूचक वक्तव्य केले होते. मात्र भरत गोगावलेंनी दिलेली २ दिवसाची मुदत संपली, तरी अद्याप रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटलेला नाही. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रिपद नेमकं कोणाला मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौ-यावर जाण्यापूर्वी पालकमंर्त्यांची घोषणा झाली होती. पालकमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर परदेशातून रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालमंत्रिपदाला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली होती.
यानंतर रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदाबाबत दोन दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल, असे सूचक वक्तव्य केले होते. मात्र गोगावलेंनी दिलेली मुदत संपली, तरी अद्याप रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटलेला नाही. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रिपद नेमकं कोणाला मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.