33.9 C
Latur
Saturday, May 3, 2025
Homeमहाराष्ट्रकर्मचा-यानेच केली धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट

कर्मचा-यानेच केली धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट

पोलिस अधीक्षकांनी केली निलंबनाची कारवाई

बुलडाणा : गुन्हेगारी, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने पोलिसांवर असते. मात्र चक्क एका वर्दीतील पोलिसानेच सोशल मीडियावर सामाजिक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल केली आहे. त्यानंतर ही बाब लक्षात येताच या पोलिस कर्मचा-याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ही खळबळजनक घटना बुलडाणा जिल्हा पोलिस दलात घडली असून गजानन खेर्डे असे या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे.

ते खामगाव येथील पोलिस नियंत्रण कक्षात सहायक फौजदार या पदावर कार्यरत असताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियाचे जाळे जगभर विस्तारले असून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ मानले जाते. मात्र या व्यक्तिस्वातंत्र्याला देखील समाजात काही मर्यादा आहेत. कुणाच्या धार्मिक, सामाजिक अथवा व्यक्तिगत भावनांना ठेच पोहोचेल, असा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो.

अनवधानाने तर कधी मुद्दाम एखादी वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणे हे कायद्याच्या अनुषंगाने फार महागात पडू शकते. असाच एक धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्हा पोलिस दलात घडला आहे. समाज माध्यमावर कार्यकर्ते किंवा नागरिकांनी आक्षेपार्ह मजकूर टाकण्याच्या घटना आपण वाचतो. मात्र, एका पोलिस कर्मचा-याने असा मजकूर टाकल्याचे निदर्शनास आले असून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे बुलडाणा जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR