38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजन‘आश्रम’चा चौथा सीझन होणार रिलीज

‘आश्रम’चा चौथा सीझन होणार रिलीज

मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेता बॉबी देओल सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशातच ओटीटीवर गाजलेल्या बॉबी देओलच्या ‘आश्रम’चा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आश्रम’मधील कलाकार चंदन रॉय यांनीच याविषयी खुलासा केला आहे.
दरम्यान, बॉबीने २०२३ च्या अखेरीस ‘अ‍ॅनिमल’ सिनेमात खलनायकाची भूमिका साकारून चांगलीच वाहवा मिळवली. बॉबी देओलकडे आता एकामागून एक सिनेमांची ऑफर आहे.

‘आश्रम’ सीरिजमधील भोपा स्वामींची भूमिका साकारणारा अभिनेता चंदन रॉय याविषयी खुलासा करत म्हणाला, प्रत्येकजण त्याला ‘आश्रम’च्या चौथ्या सीझनबद्दल विचारत असतो. मला वाटतं की यावर्षी लोक हे विचारणं थांबवतील. कारण सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सध्या स्क्रिप्टिंगवर काम सुरू असून शूटिंगचा काही भाग बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. असे जरी असले तरी या वर्षी ही सीरिज प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

‘आश्रम’ मध्ये बॉबी देओल निराला बाबांच्या प्रमुख भूमिकेत झळकत आहे. याशिवाय त्रिधा चौधरी, आदिती पोहनकर, इशा गुप्ता, अनुप्रिया गोयंका हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. धर्माच्या नावाखालील बुवाबाजीचा भ्रष्ट कारभार या सीरिजमधून पाहायला मिळतो. प्रकाश झा यांनी ही सीरिज बनवली. आता २०२४ ला ‘आश्रम’चा पुढचा सीझन पाहण्याची प्रेक्षकांत उत्सुकता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR