40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडातो निर्णय सर्वांनी मिळून घेतलेला

तो निर्णय सर्वांनी मिळून घेतलेला

कोच किरॉन पोलार्डने केली पांड्याची पाठराखण

अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबईने ६ धावांनी पराभव स्वीकारला होता. मुंबईच्या पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पांड्याला टार्गेट करण्यात येत होते. पांड्या ७ व्या स्थानावर बॅटिंग करण्यास आल्याने त्याच्यावर अनेक माजी खेळाडू टीका करत होते. मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच किरॉन पोलार्डने पांड्याची पाठराखण केली आहे.

दरम्यान, हार्दिकला सातव्या क्रमांकाला बॅटिंगला पाठवण्याचा निर्णय हा सामुदायिक निर्णय होता. तो निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला होता, असे पोलार्ड म्हणाला.

पोलार्ड म्हणाला की, कोणताही निर्णय एका व्यक्तीने घेतला नव्हता, त्यामुळे तो पांड्याचा एकट्याचा निर्णय नव्हता, टीम म्हणून आमचे काही प्लॅन होते. आम्ही फलंदाजांच्या एन्ट्री पॉईंटबाबत चर्चा करत होतो. आमच्या टॉप ऑर्डरच्या बॅटिंगमध्ये खोली असून दोन पॉवर हिटर आमच्याकडे आहेत. टीम डेव्हिड आमच्यासाठी फिनिशरचे काम करत होता. हार्दिक पांड्या ते काम अनेक वर्षे करत होता, असे पोलार्ड म्हणाला.

आम्ही एक टीम आहोत, आम्ही टीम म्हणून सामुदायिकरीत्या निर्णय घेतला होता, असे पोलार्ड म्हणाला. तुम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळत असता त्यावेळी विरोधी खेळाडूंचे काही प्लॅन असतात. अजून खूप मोठी स्पर्धा बाकी आहे. टीममधील खेळाडू गोष्टी समजून घेतील आणि आवश्यक त्या प्रमाणे कामगिरी करतील, असे पोलार्ड म्हणाला.

पोलार्डने पांड्याने गुजरात टायटन्सविरोधात बॉलिंगची सुरुवात करण्याच्या निर्णयाचे समर्थन देखील केले. गेल्या दोन हंगामामध्ये हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्ससाठी बॉलिंगची सुरुवात केलेली आहे. हार्दिक नवा बॉल चांगल्या प्रकारे स्ंिवग करतो, असे पोलार्ड म्हणाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR