21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमुख्य बातम्यामक्केतून आली अयोध्येच्या मशिदीची पवित्र वीट

मक्केतून आली अयोध्येच्या मशिदीची पवित्र वीट

सुवर्णाक्षरांनी लिहिल्या कुराणातील आयत!

नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र ठरले. आता मुस्लीम पक्षाला दिलेल्या जागेवर अयोध्येतील श्री रामलल्ला मंदिरापासून थोड्या अंतरावर भव्य मशिद उभारण्याचे काम सुरु होणार आहे. ही भव्य मशिद लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहे.

इस्लामच्या सिद्धांतावर आधारित पाच मिनार असणा-या या मशिदीच्या बांधकामासाठी पवित्र वीट एप्रिल महिन्यात अयोध्येत पोहचणार आहे. या वीटेवर सुवर्णाक्षरांनी पवित्र कुराणचे आयत कोरण्यात आले आहेत. रामनगरी अयोध्येत तयार होणा-या या मशिदीत केशरी रंगाचे कुराण देखील ठेवण्यात येणार आहे. येथे येणारे श्रद्धाळुंना गंगा जमुना संस्कृतीचे अनोखे दर्शन घडविले जाणार आहे. २९ फेब्रुवारीला मुंबईत एका कार्यक्रमात या वीटेला ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर या वीटेला अजमेर शरीफ येथे नेण्यात येईल. धन्नीपूर येथे ‘मोहम्मद बिन अब्दुला’ मशिदीची निर्मितीची जबाबदारी पाहणा-या इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन द्वारे आयोजित कार्यक्रमानुसार या वीटेला एप्रिल महिन्यात अयोध्येत पाठविण्यात येणार आहे.

या मशिदीचे नाव इस्लामचे शेवटचे पैगंबर ‘मोहम्मद बिन अब्दुल्ला’ यांच्या नावावर ठेवले आहे. या मशिदीच्या बांधकामात इस्लामच्या पांच पिलर्सचे प्रतिनिधीत्व करणारी पाच मिनारे उभी करण्यात येतील. कलमा (शपथ), नमाज (प्रार्थना), हज (मक्केची यात्रा), जकात (दान), आणि रोजा (उपवास) याचे प्रतिनिधीत्व म्हणून पाच मिनारे असणार आहेत.

अयोध्येतील राम जन्म भूमीचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने धन्नीपूर गावात मस्जिद उभारण्यासाठी पाच एकर जमिन देण्यासाठी सरकारला आदेश दिले होते. यावरुन सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने एक समिती नेमली. मोहम्मद बिन अब्दुल्ला मशिदीत एक हॉस्पिटल, शिक्षणाचे केंद्र देखील असणार आहे. तसेच ९ हजार क्षमतेचे नमाज पढण्याचे ठिकाणही असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR