19 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यातील दिवाळीसणावरही जरांगे फॅक्टरचा प्रभाव

मराठवाड्यातील दिवाळीसणावरही जरांगे फॅक्टरचा प्रभाव

जरांगेंचा फोटो असलेले ‘एक मराठा लाख मराठा’ कंदील

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्ष-दीड वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे मोठीच खळबळ उडाली. आता हाच जरांगे फॅक्टर मराठवाड्यातील दिवाळीसणातही दिसू लागला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीमुे प्रसिद्धीझोतात आलेले मनोज जरांगे आता आकाशकंदिलांवर झळकू लागले आहेत. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांचे बॅनर, पोस्टर, गाणी लावून झाली आता दिवाळीच्या आकाशदिव्यांवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रतिमांची चलती आहे. ‘एक मराठा लाख मराठाप लिहिलेल्या कंदिलांचीही चलती आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभेत २८८ जागांवर लक्ष ठेवून असणारे मनोज जरांगे यांनीही निवडणुकांच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. काही मतदारसंघांत उमेदवार उभे करणार अशी घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतं राजकीय समिकरण समोर येणार याची सगळीकडे चर्चा आहे. दरम्यान, राजकीय पटावर मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे कंदीलांवर दिसू लागले आहेत.

आकाशदिव्यांवर मनोज जरांगे
मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या मनोज जरांगे यांच्या जरांगे पॅटर्नची अवघ्या वर्षभरात राज्यभर एकच चर्चा होती. आता विधानसभेच्या २८८ जागांवर लक्ष ठेवून असलेल्या मनोज जरांगे यांचा पॅटर्न मराठवाडी दिवाळसणावरही पडल्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात अनेक बाजारपेठांमधील आकाशकंदिलांवर जरांगे पाटलांचे फोटो दिसू लागले आहेत. जरांगेंचे आकाशकंदील पटापट विकलेही जात असल्याचे दुकानदार सांगत आहेत.

‘एक मराठा लाख मराठा’ कंदिलांची चलती
सध्या बाजारपेठा वेगवेगळ्या आकाशदिव्यांनी सजल्या आहेत. रंगीबेरंगी, लाल, गुलाबी आकाशकंदिलांमध्ये भगव्या आकाशकंदिलातून हळूच मनोज जरांगे यांच्या प्रतिमाही चमकताना दिसतायत. ‘एक मराठा लाख मराठा’ लिहिलेल्या आकाशदिव्यांचीही एकच चलती असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR