36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeधाराशिवबँकेला गहाणखत करून दिलेली जमीन विकली, कर्जदारावर गुन्हा दाखल

बँकेला गहाणखत करून दिलेली जमीन विकली, कर्जदारावर गुन्हा दाखल

धाराशिव : प्रतिनिधी
बीड येथील प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी बँकेला गहाणखत करून दिलेली जमीन परस्पर विकून बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाणे येथे चौघांच्या विरोधात दि. १ एप्रिल रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरेवाडी ता. वाशी जि. धाराशिव येथील आरोपी सुभद्रा अनंतराव कुरुंद, अनंतराव कारभारी कुरुंद, हनुमंत अनंदराव कुरुंद, सखाराम अनंतराव कुरुंद या चौघांनी बीड येथील प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँकेला जमीन गहाणखत करून दिली होती. गहाणखत करून देऊन प्रियदर्शर्नी महिला नागरी बँकेकडून २ लाख रूपये कर्ज उचलले आहे.

बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता गहाणखत करुन दिलेले क्षेत्र बँकेचे आर्थिक नुकसान व्हावे, या हेतुने परस्पर हस्तांतरण करुन बॅकेची आर्थिक फसवणुक केली. या प्रकरणी न्यायादडाधिकारी प्र.वर्ग न्यायालय वाशी यांनी यांच्या आदेशावरून बँकेचे शाखाधिकारी राहुल शामराव मुंगळे यांनी दि.१ एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पोलीस ठाणे येथे ४२०, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये वाशी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR