33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरस्थानिक गुन्हे शाखेकडून चार मोटारसायकली जप्त

स्थानिक गुन्हे शाखेकडून चार मोटारसायकली जप्त

लातूर : प्रतिनिधी
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लातूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चोरीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या असून उद्धव पांडुरंग सूर्यवंशी रा. घारोळा, ता. चाकूर यास अटक कण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सदर पथके माहिती घेत असताना १ एप्रिल रोजी पथकाला माहिती मिळाली की, चाकूर तालुक्यातील मौजे घारोळा येथील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगार त्याने चोरलेल्या मोटरसायकली घरासमोर लावून त्या मोटरसायकली विकण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने १ एप्रिल रोजी सदर पथक मौजे घारोळा तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे पोचून एका घरासमोर मोटार सायकलसह थांबलेल्या उद्धव सूर्यवंशी यास विचारपूस केली असता त्याने त्याच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटरसायकल २०२३ मध्ये चाकूर येथील कोरे हॉस्पिटल समोरून तसेच इतर तीन मोटरसायकली लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याचे सांगितले
चार मोटारसायकली ज्याची एकूण किंमत १ लाख ५ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस ठाणे चाकूर येथील एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून उर्वरित तीन मोटार सायकल बाबत तपास सुरू आहे. नमूद आरोपीला पोलीस ठाणे चाकूर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, राजेश कंचे, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, चालक पोलीस अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR