37 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeधाराशिवराँग साईडने गाडी चालविणा-याची पोलिस निरीक्षकाला आरेरावी

राँग साईडने गाडी चालविणा-याची पोलिस निरीक्षकाला आरेरावी

धाराशिव : प्रतिनिधी
येरमाळा येथे येडेश्वरी देवीच्या यात्रा बंदोबस्तावर असलेल्या भूम पोलिस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांशी राँग साईडने गाडी चालविणा-या चालकाने आरेरावी करत हुज्जत घालून ढकलून दिले. त्यांना बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात येरमाळा पोलीस ठाणे येथे दि. २४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, येरमाळा येथे सध्या येडेश्वरी देवीची यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रल्हाद सुर्यवंशी हे कर्तव्यावर होते. यावेळी आरोपी आबासाहेब वखरे व त्यांच्या सोबतच्या एका महिलेने दि.२४ रोजी दुपारी स्कॉपियो गाडी रॉंग साईडने चालविली. त्यामुळे यात्रेकरीता आलेल्या भाविकांच्या ३०० ते ४०० गाड्याने रस्ता जाम झाला. यावेळी पोलीस निरिक्षक प्रल्हाद सुर्यवंशी हे पोलीस पथकासह येरमाळा ते पारडी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर शेतमाल खरेदी केंद्राजवळ वाहतूक सुरळीत करत होते.

त्यावेळी आरोपींनी पोलीस निरिक्षक सुर्यवंशी व पोलीस पथकाशी हुज्जत घातली. आरेरावीची व असभ्य भाषा करुन त्यांना ढकलून दिले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर तुला बघून घेतो, अशी धमकी देवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी प्रल्हाद सुर्यवंशी दि.२४ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस ठाणे येथे ३५३, ३३२, ५०६, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR