28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeसोलापूरजनतेच्या सेवेसाठी पोलिस यंत्रणा सदैव दक्ष असेल

जनतेच्या सेवेसाठी पोलिस यंत्रणा सदैव दक्ष असेल

पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांची ग्वाही

सोलापूर : शहरातील वाढती गुन्हेगारी, , चोऱ्या यावर प्रतिबंध घालून सामान्य जनतेला निर्भयपणे जगता यावे, सामान्य जनतेला निर्भयपणे जगता यावे यावर आपला प्रामुख्याने भर असणार आहे. त्यांना त्रास होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा २४ तास ऑनड्यूटी दक्ष असेल, अशी ग्वाही नूतन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली.

सोलापूरचे मावळते पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्याकडून नूतन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधून शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.सामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस यंत्रणेकडे असली तरी माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून अनेक समस्या यंत्रणेला मिळू शकतात, यासाठी आपणाकडून सहकार्य अपेक्षित आहे.

लोकांशी निगडित घडणाऱ्या प्रश्नांची उकल करून त्यांना भयमुक्त जगता यावे हा आपला मुख्यत्वे अजेंडा असणार आहे. घरफोड्या, चेनस्नॅचिंग, मोबाइल चोऱ्या अशा घटना रोखण्यासाठी आपण तत्पर आहोत. याशिवाय शहर गुण्यागोविंदाने नांदेल यासाठी प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतील. सायबर क्राइम विभागामध्ये मुंबईला आपण डीसीपी म्हणून काम केलेले आहे, तो अनुभव पाठीशी असून, त्याचा नक्कीच येथे उपयोग होईल, असे ते म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी डीजे, शहरात वाढलेल्या डिजिटल वॉरसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर नक्कीच लक्ष देऊन नियमबा कृती करण्यावर कारवाई होईल. आगामी काळात अधिक माहिती घेऊन त्यानुसार आपली कृती असेल असेही एम. राजकुमार यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR