नवी दिल्ली : देशभरात प्रकाशाचा सण दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. बाजारपेठेत सर्वत्र आनंद आणि उत्साह आहे. त्यानिमित्त दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. यापूर्वी राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
दिवाळीच्या या खास प्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी उप राष्ट्रपती धनखड यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड हेही उपस्थित होत्या. तसेच केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली आहे.