पुणे : पुणे लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका कधी जाहीर होणार? असा प्रश्न राज्याला पडला होता. मात्र पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.
पुणे लोकसभा पोट निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. या आदेशाला निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावरच आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुणे लोकसभा निवडणूक घेण्यावर स्थगिती दिली आहे. सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळे पोटनिवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी सात आठवड्यांनी होणार आहे. पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू असेही निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
पुणे लोकसभा मतदार संघाते भाजपचे गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे मतदारसंघाची जागा रिक्त आहे.. त्यानंतर काही महिन्यात दोन्ही मतदार संघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता होती. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले होते. गिरीश बापट यांच२९ मार्च रोजी निधन झाले होते. १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ ला संपत आहे. आगामी लोकसभेची निवडणूक काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे एक वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ शिल्लक असल्यास निवडणूक घेणं बंधनकारक असतं.
पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला दिले होतेय याविरोधात निवडणूक आयोगात सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आले होते. कोर्टाच्या या निर्णयाला जर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली त्यामुशे पोटनिवडणूक होणार नाही, थेट लोकसभा निवडणुकीतच पुणे मतदारसंघाचा खासदार निवडला जाणार आहे.