16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeपरभणीदेशात व राज्यात राजकारणाचा दर्जा अतिशय घसरला : अनिल घनवट

देशात व राज्यात राजकारणाचा दर्जा अतिशय घसरला : अनिल घनवट

कौसडी : देशात व राज्यात राजकारणाचा दर्जा अतिशय घसरला आहे. एका पक्षाचे तिकिटावर निवडणूक जिंकलेले खासदार, आमदार एका रात्रीत पक्ष बदलतात. अशा तत्वहीन पक्ष व व्यक्तीच्या हातात सत्ता एकवटल्यामुळे देशातील जनता त्रस्त आहे. देश पुन्हा संपन्न करण्यासाठी व कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचा पर्याय आहे. जनतेने या पक्षात सामील होऊन पक्षाचे प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी पक्षाची बांधणी करून पक्षाचे सदस्य नोंदणी करा, असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी परभणी येथे कार्यकर्ता बैठकीत केले.

स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचा दौरा सुरू असून दि.२९ नोव्हेंबर रोजी परभणी बाजार समिती सभागृहात पक्षाची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. पुढे बोलताना घनवट म्हणाले की, सर्वच पक्षांनी जनतेचे शोषण करून सतेत टिकून राहण्याच्या प्रयत्न करत आहेत. पक्षाची विचारधारा, तत्वज्ञान असे काही आता राहिले नाही. ज्या पक्षाला काल पर्यंत शिव्या घातल्या, त्याच पक्षात दुस-या दिवशी प्रवेश करून पद व पैसा मिळवले जात आहे. यासाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते युगत्मा शरद जोशी यांच्या स्थापन केलेला स्वतंत्र भारत पक्ष मजबूत करणे काळाची गरज आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा प्रश्न, विजेचा पुरवठा, पिकविमा, नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व स्थानिक प्रशनावर जानेवारी महिन्यात आंदोलन करण्यात येईल असे घनवट यांनी जाहीर केले.

युवक, युवतींनी वेगवेगळ्या पक्षांच्या भंपक प्रचाराला बळी न पडता अर्थशास्त्रीय विचार व नियत्रंण मुक्त बाजार, व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार नागरिकांमध्ये प्रसार करण्यासाठी व लाइन्सस, परमीट, कोटा व्यवस्था बदलविण्याकरीता स्वातंत्र्य भारत पक्षात सामील व्हावे, असे आवाहन सीमाताई नारोडे यांनी केले. स्वभापच्या जिल्हाध्यक्ष पदावर रामभाऊ शिंदे यांची नियुक्ती सवार्नुमते करण्यात आली. या बैठकीस शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, आनंत पवार, हारीभाउ सूर्यवंशी, माधव खरात, माणिकराव घुगे, गनेशराव पवार, पंडितराव शिंदे, अकब बेग, शेख रहीम यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR