नवी दिल्ली : भारत पाकिस्तानमध्ये सन १९७१ मध्ये झालेल्या युद्धावेळी भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने पाकिस्तानची अत्याधुनिक पाणबुडी गाझीला जलसमाधी दिली होती. या पाणबुडीचे अवशेष आता सापडले आहेत.
भारतीय नौदलाची डीप सबमर्जेस रेस्क्यू व्हेईकलने हे अवशेष शोधून काढले आहेत. मिलन २०२४ अभ्यासादरम्यान रेस्क्यू ऑपरेशनची प्रात्यक्षिके सुरु असताना पाणबुडीला हे अवशेष आढळले.
पाकिस्तानी नौदलाची फ्रिगेड क्लास पाणबुडी पीएनएस गाझी हिला १९७१ च्या युद्धावेळी विशाखापट्टणम जवळ समुद्रात रहस्यमयरित्या जलसमाधी मिळाली होती. यामध्ये ९३ पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले गेले होते.
याशिवाय एक जपानी पाणबुडी आरओ ११० देखील याच ठिकाणी मिळाली आहे. या पाणबुडीला रॉयल इंडियन नेव्ही आणि ऑस्ट्रेलियन नौदलाने दुस-या महायुद्धावेळी पाण्यात बुडवले होते. गेल्या ८० वर्षांपासून ही पाणबुडी समुद्राच्या तळाशी पडून आहे.