24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभरधाव टेम्पोची ६ वाहनांना धडक

भरधाव टेम्पोची ६ वाहनांना धडक

सीसीटीव्ही फुटेज समोर

पुणे : पुण्यात पिरंगुट घाटात अपघाताची घटना घडली. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या अपघातात टेम्पोने ६ वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पाहून अनेकांच्या मनात धडकी भरेल. अलीकडे पुण्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत टेम्पोचालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे- कोलाड महामार्गावर पिरंगुट येथील घाट उतारावर बाजूला सिमेंटच्या विटा घेऊन जाणा-या टेम्पोने पाच दुचाकी आणि एका चार चाकी वाहनाला धडक दिली.

सात जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर
या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका डॉक्टरचा समावेश असून गंभीर अवस्थेत त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले आहे. उर्वरित सहा जखमींना पिरंगुट तसेच लवळे फाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR