22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeधाराशिवकळंब शहरात चोरीचा सिलसिला सुरूच; तीन दुकाने फोडली

कळंब शहरात चोरीचा सिलसिला सुरूच; तीन दुकाने फोडली

कळंब : प्रतिनिधी
कळंब शहरात चोरट्यांनी हैदोस घातल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चार चोरट्यांनी शनिवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी पहाटे कळंब शहरातील परळी रोडवरील तीन दुकाने फोडून दुकानातील टेबलच्या ड्राव्हर मधील १ लाख ४५ हजार रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब ते येरमाळा रस्त्यावरील हासेगाव हद्दीतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सव्वातीन लाख रुपये लुटल्याची घटना ताजी असतानात, पुन्हा शनिवारी पहाटे चोरट्यांनी शहरातील तीन दुकाने फोडून लाखो रुपयांची रोखड लुटली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता अंगात काळे, लाल जरकिन घातलेल्या चार चोरट्यांनी कळंब येथील परळी रस्त्यावरील रजमंगल बिल्डिंग मटेरियल या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील ६५ हजार रुपयाची रोकड लुटली. नंतर या चोरट्यांनी माऊली टायर दुकानाकडे आपला मोर्चा वळविला.

दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ८० हजार रुपयाची रोकड लंपास केली. येथून पुढे हाकेच्या अंतरावर असलेले लोढा यांचे बिल्डिंग मटेरियल दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील किती पैसे पळविले याची माहिती मिळू शकली नाही. एका रात्रीत दुकान तीन दुकाने फोडल्याची घटना सिसिटिव्ही मध्ये कैद झाली आहे. शहरात चोरीच्या दुस-यांदा घटना घडल्याने चोरट्यांनी कळंब पोलिसांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे.

मध्यंतरी पोलिसांची शहरातील प्रत्येक झोन तसेच परळी, येरमाळा, ढोकी रस्ता आदी मार्गावर पोलिस व्हॅन गस्त घालत होती. त्यामुळे चो-यांचे प्रमाण काहीअंशी थांबले होते. पण सध्या चोरीच्या प्रकारात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR