दुस-या डावात भारताने ऑस्ट्रेलिया दिले ५३४ धावांचे लक्ष्य
पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये सुरू असून आज तिस-या दिवसाचा खेळ संपला. दुस-या डावात भारताने ऑस्ट्रेलियासेमोर ५३४ धावांचे तगडे आव्हान दिले आहे.
तर दुस-या डावात ऑस्ट्रेलियाने ३ गडी गमावून केवळ १२ धावा केल्या आहेत. यात नॅथन मॅकस्वीनीला खातेही उघडता आले नाही, तर पॅट कमिन्स दोन धावा करून बाद झाला आणि मार्नस लॅबुशेन तीन धावा करून बाद झाला. उस्मान ख्वाजा तीन धावा करून नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाला अजून ५२२ धावांचा पल्ला गाठायचा आहे.
बुमराहने आतापर्यंत दोन बळी घेतले आहेत, तर सिराजला एक विकेट मिळाली आहे.भारताने दुस-या डावात ६ बाद ४८७ धावा करून डाव घोषित केला. दुस-या डावात ४८७ धावा करण्यापूर्वी टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १५० धावा केल्या. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांवर आटोपला. दुस-या डावात भारताकडे ४६ धावांची आघाडी होती. या अर्थाने भारताची एकूण आघाडी ५३३ धावांची झाली. यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ५३४ धावांचे लक्ष्य पार करायचे होते.
विराट १०० यशस्वी १६१
विराट कोहलीच्या शतकाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. त्याने शतक झळकावताच भारतीय ड्रेसिंग रुमने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. विराटने १४३ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्या कसोटी कारकिदीर्तील हे ३० वे शतक आहे. तर विराटपुर्वी यशस्वी जैस्वालने १६१ धावांची झुंझार खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत १५ चौकार आणि तीन षटकार ठोकले. तर केएल राहुलने पाच चौकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या.