28.1 C
Latur
Wednesday, November 26, 2025
Homeमहाराष्ट्रठाण्यामध्ये बर्निंग कारचा थरार

ठाण्यामध्ये बर्निंग कारचा थरार

ठाणे : प्रतिनिधी
मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावरील नितीन कंपनी उड्डाणपुलावर एका मोटारकारला सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत कारच्या आतील बाजूचे पूर्णत: नुकसान झाले.

आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीच्या घटनेने मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प झाली.

घाटकोपरचे रहिवासी असलेले दीपक गवळी वाघबीळकडे डेकोरेशन साहित्य घेऊन मोटारीने निघाले होते. नितीन कंपनी उड्डाणपुलावर आल्यावर त्यांच्या मोटारीने पेट घेतला. ही माहिती मिळताच पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. फायर वाहनासह, रेस्क्यू वाहन, वॉटर मिक्स फायर टेंडर वाहनाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR