24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र‘उबाठा’च्या गटाने माफी मागितले पाहिजे

‘उबाठा’च्या गटाने माफी मागितले पाहिजे

मुंबई : शिवाजी पार्कवर झालेली ‘इंडिया आघाडी’ची सभा ही फ्लॉप शो होता. त्यामुळे इतर राज्यातून तडीपार झालेली लोक एकत्र आली होती. त्यामुळे ‘उबाठा’च्या गटाने माफी मागितले पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  राज्यात महायुती ४५ चा पार करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सीएम शिंदे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा आहे का? एकमेकांकडे निराशाने पाहत होते. ते पुढे म्हणाले की, इतर राज्यातून तडीपार झालेली एकत्र आली होती. मग मोदीजींना ही लोक कसे तडीपार करतील? गेल्या ५० वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते मोदीजींनी दहा वर्षात करून दाखवले. अर्थव्यवस्था तिस-या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न आहे. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जात आहे.

लोकांनी जागा दाखवून दिली
मोदीजी एका उंचीवर घेऊन गेले आहेत. चौकीदार चोर आहेत म्हणाले, पण लोकांनी त्यांना जागा दाखवून दिली. यांच्याकडे पंतप्रधान पण चेहरा नसल्याने सातत्याने एकमेकांना पाहत असतात अशी टीका त्यांनी केली. शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या ठाण्यामधील रोडशोवरून खोचक टोमणा मारला. उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या सभेतील भाषणाच्या कालावधीवरही शिंदे यांनी टीका केली. पाच मिनिटे भाषणासाठी देण्यात आली यावरून त्यांची पत दिसून आली, असा टोला शिंदे यांनी लगावला.

हिंदू बंधू भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का?
माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द कालपासून बंद झाला. काल त्यांनी हिंदू बंधू भगिनींनो म्हणणं टाळलं. हिंदू बंधू भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR