15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरचाकरमान्यांचे मतदान ठरविणार कोकणातील उमेदवारांचे भवितव्य

चाकरमान्यांचे मतदान ठरविणार कोकणातील उमेदवारांचे भवितव्य

लातूर : निवडणूक डेस्क
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणा-या अटीतटीच्या लढतीत चाकरमान्यांची मते ही उमेदवाराची राजकीय भवितव्य ठरवणारी असणार आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी चाकरमान्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १५ जागा आहेत. पैकी ८ जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी सरळ लढत आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट ४ जागा, शिंदे गट ३ जागा, भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट १ जागा लढवत आहे. तर, शेकापने ४ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पैकी चार जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत आहे. एका जागेवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार उभे असून एका जागेवर भाजपने उमेदवार दिला आहे. त्यामुळे नेमका फायदा कुणाला होणार? चाकरमान्यांची मते कुणाच्या पारड्यात पडणार? याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास १५ ते १६ टक्के चाकरमानी आहेत. त्या खालोखाल रत्नागिरी जिल्ह्यात ८ ते १० टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान ५ ते ७ टक्के चाकरमानी हे मतदानाचा हक्क बजावतात. त्यामुळे सध्या सर्वच उमेदवारांनी चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. हाच चाकरमानी गावी यावा यासाठी सर्वच पक्षीय उमेदवारांनी मुंबई, ठाणे, कल्याणसह, वसई विरार, नालासोपारा या मुंबई शहराच्या आसपासच्या भागामध्ये बैठकांचे आयोजन केले. गावच्या विकासासाठी काय केले जाईल? यासाठी आश्वासनांची खैरात केली. एकंदरीत कोकणातील विधानसभा निवडणूक चाकरमान्यांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याणसह कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारे चाकरमान्यांचे मतदान हे उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR