19 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeक्रीडावुमन्स प्रीमियर लीगचे वाजले बिगुल

वुमन्स प्रीमियर लीगचे वाजले बिगुल

नवी दिल्ली : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा कधी आणि केव्हापासून सुरू होणार? या प्रश्नांना पूर्णविराम लागला आहे. बीसीसीआयने वुमन्स प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार स्पर्धा २३ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि अंतिम फेरीचा सामना १७ मार्चला होणार आहे.

यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा यंदा दोन ठिकाणी होणार आहे. सुरुवातीचे सामने बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानात, तर दुस-या टप्प्यातील सामने दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात होतील. स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या सामन्यापासून होणार आहे.

हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानात संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात होणार आहे. अंतिम फेरीपर्यंत एकूण २२ सामने होणार आहेत. १३ मार्चपर्यंत साखळी फेरीचे सामने होतील. तर १५ मार्चला एलिमिनेटर फेरी पार पडेल. तसेच अंतिम फेरीचा सामना १७ मार्चला होणार आहे. सर्व सामने संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR