28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरकुणबी नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

कुणबी नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

लातूर : लातूर जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार महसूलचे सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार, शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी, तालुका भूमीअभिलेख अधिकारी यांनी युद्ध पातळीवर काम सुरु केलं आहे. जबाबदारीचे वाटप केल्यामुळे नोंदी शोधण्याच्या कामाला गती आली आल्याचे अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यात यंत्रणा कामाला लागली असून ज्या ज्या विभागाकडे १९६८ पूर्वीच्या नस्ती आहेत, त्या तपासल्या जात आहेत.

१९४८ पूर्वीच्या नोंदी मोडी अथवा उर्दू मध्ये असल्यामुळे लिप्यांतर तज्ज्ञ सोबत घेऊन अत्यंत बारकाईने या नोंदी तपासल्या जात आहेत. त्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त केले आहेत. जिल्हा स्तरावरुनहीं काही अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी गेले आहेत. रोजच्या रोज या कामाचा आढावा जिल्हाधिकारी घेत असल्यामुळे या कामाला मोठी गती आली आहे. जिल्ह्यातील ज्या शाळा जुन्या आहेत त्यांचे निर्गम उतारे बघितले जात असून त्यासाठी शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी तालुका शिक्षण अधिकारी यांना तज्ज्ञ लोकांची टीम करुन या नोंदी तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यांच्याहीं टीम त्या त्या शाळेत जाऊन या नोंदी तपासत असल्याचेही अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR