जगावर दिवाळखोरीचे सावट; विकसनशील देशांचे बजेट कोलमडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मध्यपूर्वेमध्ये भडकलेला युद्धाचा वणवा आता केवळ सीमेपुरता मर्यादित राहिलेला नसून, त्याने संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला आपल्या विळख्यात घेतले आहे. इराण युद्धाची ठिणगी पडल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. या ऊर्जा संकटामुळे जगभरातील पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली असून विकसनशील देशांचे बजेट कोलमडले आहे. या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी जगातील २७ देशांनी जागतिक बँकेकडे आपत्कालीन आर्थिक मदत मिळवण्यासाठी तातडीने अर्ज केले आहेत. वाढती महागाई आणि इंधनाचा तुटवडा यामुळे या देशांवर आर्थिक आणीबाणीचे सावट आहे.

रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला मिळालेल्या जागतिक बँकेच्या एका अंतर्गत आणि गोपनीय दस्तावेजानुसार, २८ फेब्रुवारीपासून मध्यपूर्वेतील संघर्ष तीव्र झाल्यानंतर अनेक देशांनी आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी संकट निवारण प्रणाली सक्रिय केली आहे. या २७ देशांपैकी तीन देशांना जागतिक बँकेकडून नवीन आपत्कालीन निधी मंजुरीची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे, तर उर्वरित देश कागदपत्रांची पूर्तता करत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव जागतिक बँकेने या देशांची नावे आणि त्यांनी मागितलेल्या रकमेचा आकडा जाहीर करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, या संकटामुळे केवळ तेलच नाही, तर शेतीसाठी लागणा-या खतांचा पुरवठा खंडित झाल्याने अन्नधान्य तुटवड्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

केनिया, इराकने जाहीरपणे मागितली तातडीची मदत
जागतिक बँकेकडे गुप्तपणे अर्ज करणा-या देशांमध्ये अनेक आफ्रिकन आणि आशियाई देशांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान, केनिया आणि इराक या दोन मोठ्या देशांनी स्वत:हून पुढे येत जागतिक बँकेकडे तातडीच्या आर्थिक पॅकेजची मागणी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केनियामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, ज्यामुळे तिथे अंतर्गत असंतोष वाढतो आहे. दुसरीकडे, इराक हा स्वत: तेल उत्पादक देश असूनही, युद्धाच्या भीतीमुळे आणि तेल बाजारातील कमालीच्या अस्थिरतेमुळे त्याच्या एकूण महसुलात मोठी घसरण झाली आहे. यामुळे सरकारी कर्मचा-यांचे पगार देणेही इराकला कठीण बनले आहे.

अजय बंगा यांचा मास्टरप्लॅन
या अभूतपूर्व जागतिक संकटावर मात करण्यासाठी भारतीय वंशाचे जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, तात्काळ गरज भासल्यास बँक २० ते २५ अब्ज डॉलर्सचा आपत्कालीन निधी त्वरित जारी करू शकते. याशिवाय, जुन्या प्रकल्पांमधील न वापरलेला शिल्लक निधी आणि इतर विशेष कार्यक्रम एकत्र केल्यास, पुढील सहा महिन्यांत ही मदत ६० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवली जाईल. परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास हा आपत्कालीन मदत निधी १०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याची तयारी जागतिक बँकेने ठेवली आहे. सध्या एकूण १०१ देश या संकट निधी प्रणालीचा लाभ घेण्यास पात्र असून, त्यापैकी ५४ देश ‘रॅपिड रिस्पॉन्स प्लॅन’ अंतर्गत येतात, ज्यांना मंजूर निधीच्या १० टक्के रक्कम काही तासांत मिळते

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30

Latest news