22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रमग पुन्हा उपोषण का? जरांगे पाटलांना राज ठाकरे यांचा सवाल

मग पुन्हा उपोषण का? जरांगे पाटलांना राज ठाकरे यांचा सवाल

नाशिक : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करताना मग पुन्हा उपोषण का? असा सवाल केला.

सगळ्या मागण्या मान्य झाल्यात पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही. विजयोत्सव साजरा झाला पण मनोज जरांगे पाटील यांना कोणता विजय मिळाला? असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला. तर आनंद व्यक्त करत होतात मग पुन्हा उपोषण कशासाठी? असा सवालही त्यांनी जरांगेंना केला.

येत्या १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणास बसणार आहेत, अशी त्यांनी घोषणा केली. यावर राज ठाकरे म्हणाले, लोकांसमोर मी सांगितलेलं हे होणार नाही. राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले तेव्हा बोललेलो हे होणार नाही. हा टेक्निकल विषय आहे, कायदेशीर बाबी आहेत, असा निर्णय राज्य सरकर घेऊ शकणार नाही, त्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागेल. तर मुख्यमंत्री त्या दिवशी तिथे गेलेले. विजयोत्सव साजरा झाला. कोणता विजय मिळाला? मराठा बांधवांना कळलं का, काय झालं? विजय झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता? असा सवालही त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR