21.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता

राज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता

प्रकाश आंबेडकर यांचे धक्कादायक वक्तव्य

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन केले. महात्मा फुले यांनी जो लढा सुरू केला त्याची फळे आपण चाखतो आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. तसेच राज्यात ३ डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता असल्याचे वक्तव्य केले आहे.

धार्मिक हस्तक्षेप होत आहे आणि आमच्या वैदिक धर्मावर आघात होत आहे, असा ज्यांनी कांगावा केला होता त्यांनी आता देशात हिंदूंचे राज्य असून देशाला हिंदूराष्ट्र करावे, संबोधित करावे, असा नवीन कांगावा सुरू केला आहे. याचे गांभीर्य कुणाच्या लक्षात आले नसेल पण पुन्हा देशात वैदिक परंपरा सुरू कराव्या. संविधान बदलणार अशी घोषणा केली जात आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आरएसएस, विश्व हिंदू परिषद यावर बोलत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना संघाच्या कार्यकारिणीत प्रांत प्रतिनिधी पदापर्यंत जाता आले नाही. ते आज सांगतात, मी असताना संविधान बदलणार नाही. माझ्या मते रस्त्यावरील माणूस कितीही ओरडला तर त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे. जे ते बोललेत ते मोहन भागवत यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

३ डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत ६ डिसेंबरनंतर काहीही घडू शकते, अशी पोलिसांना सूचना देण्यात आली आहे. चार राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर घडेल. देशात मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केले जात आहे, ओबीसींनी सतर्क राहावे, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR