33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये

ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये

प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळ अन् प्रकाश शेंडगेंना इशारा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना इशारा दिला आहे. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. कारण, इतिहास काढला, तर तुम्ही मंडलबरोबर नाही तर, कमंडलबरोबर होता, हे दिसेल, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

शनिवारी (२५ नोव्हेंबर) मुंबईतील शिवाजी पार्क येथे वंचित बहुजन आघाडीने संविधान सभेचे आयोजन केले होते. तेव्हा प्रकाश आंबेडकर बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘‘आरक्षणावरून वाद सुरू झाला आहे. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. कारण, इतिहास काढला, तर तुम्ही मंडलबरोबर नव्हता तर, कमंडलबरोबर होता. मग, ते प्रकाश शेंडगे असोत किंवा छगन भुजबळ.’’

‘जनता दल आणि त्याआधी जनता पक्षाबरोबर मिळून आम्ही ओबीसी आरक्षण मिळवले आहे. आता आरक्षण वाचवता येत नाही, म्हणून भिडवण्याची भाषा चालली आहे,’ असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ‘‘सध्या देशात आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजाला एकमेकांच्या विरोधात लढवले जात आहे, अशी परिस्थिती आहे. हे थांबवण्याऐवजी खतपाणी घातलं जात आहे. २००२ मध्ये गोध्रा हत्याकांड घडलं, २०२३ मध्ये मणिपूरमध्ये नरसंहार झाला. कदाचित ३ डिसेंबरनंतर देशातील कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या,’’ असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR