गटबाजीवर उपाय नाही अन् म्हणे मी बिनटाक्यांचे ऑपरेशन करतो!

अय्यूब कादरी
धाराशिव : मी ऑपरेशन करतो, ते बिनटाक्याचे करतो… असे लोकप्रिय विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिवच्या दौ-यात केले. स्वत:ला इतके सक्षम समजणारे शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीवर उत्तर शोधण्यात अद्याप तरी अयशस्वी ठरले आहेत. काल त्यांच्या दौ-यावेळी शिवसेनेच्या एका गटातील नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांना स्थानबद्ध केले होते. अशाप्रसंगी विरोधी पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेणे समजू शकते, मात्र उपमुख्यमंर्त्यांचा दौरा आणि त्यांच्याच पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे.. हे दुर्मीळच असावे. हा दुर्मीळ प्रसंग धाराशिवकरांना रविवारी अनुभवता आला.

राजकीय नेते ब-याचवेळा असंबंद्ध बोलून जातात. माध्यमांतून त्याला प्रसिद्धीही मिळते. कार्यकर्त्यांना खूश करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा त्यामागचा हेतू असतो. लोकांचे काय, ते काही दिवसांनी विसरून जातात. रविवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौ-यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात असेच बोलून गेले. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो, बिनटाक्यांचे ऑपरेशन करतो, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना फोडून मोठी मर्दुमकी गाजवली, असे दाखवण्याचा शिंदे यांचा नेहमीच प्रयत्न असतो. तसे दाखवणे त्यांची मजबुरी आहे, ही वस्तुस्थिती आहे.

धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत दोन गट आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही गटबाजी चांगलीच उफाळून आली होती. माजीमंत्री, आमदार तानाजी सावंत आणि माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, उमरग्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे ठळकपणे दिसणारे दोन गट. या गटांमध्येही बरेच अंर्तर्विरोध दिसून येतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या गटांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला, असे आरोप झाले. गटबाजी नवी नाही, तरीही शिंदे यांना यावर उपाय सापडलेला नाही.

परिस्थिती अशी असताना शिंदे मात्र नेहमीच दर्पोक्ती करत असतात. शिवसेना फोडल्याचा वास या दर्पोक्तीला असतो. शिवसेना का फुटली, चौकशीचा ससेमिरा मागे लागला होता का, आता सध्या शिवसेनेतील एक गट भाजपमध्ये जाणार का, हे आणखी उपप्रश्न आहेत. कदाचित त्यामुळेच शिंदे यांना अशी विधाने करावी लागत असतील.

भाजप सशक्त असल्याचा महायुतीला फायदा
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात भाजप सुस्थितीत आहे, सशक्त आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. शिवसेनेतील गटबाजी पाहता कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उमेदवारांना सहलीवर पाठवले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या पाठबळावर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणे सहज शक्य असतानाही महायुती अभेद्य ठेवण्यासाठी आमदार पाटील यांनी शिवसेनेला सोबत घेऊन उपाध्यक्षपद दिले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news