29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeक्रीडाआयपीएल २०२४ मध्ये हे पाच खेळाडू बदलणार संघाचे नशीब

आयपीएल २०२४ मध्ये हे पाच खेळाडू बदलणार संघाचे नशीब

नवी दिल्ली : आयपीएल २०२४ च्या सत्राला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये १० संघात आयपीएल २०२४ ची ट्रॉफी जिंकण्यासाठी रोमांचक लढत होणार आहे. या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तथापि, काही परदेशी नावे आहेत जी इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामात आपल्या दमदार खेळाने आपल्या संघाचे चित्र बदलू शकतात. मिचेल मार्श, कॅमेरून ग्रीन, जेराल्ड कोएत्झी, मिचेल स्टार्क आणि रहमानुल्ला गुरबाज हे पाच असे खेळाडू आहेत, जे या हंगामात आपल्या शानदार खेळाने संघाचे नशीब बदलू शकतात.

१. मिचेल मार्श
मिचेल मार्श आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे आणि तो संघासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो. त्याने गेल्या १७ टी-२० डावांमध्ये १५८ च्या स्ट्राईक रेटने ४७४ धावा केल्या आहेत. त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. फलंदाजीसोबतच मार्श गोलंदाजीतही योगदान देतो.

२. कॅमेरून ग्रीन
कॅमेरून ग्रीन आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे. गेल्या मोसमात तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. आयपीएल २०२४ साठी, आरसीबीने त्याला आपल्या संघात घेतले आहे. ग्रीन त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

३. जेराल्ड कोएत्झी
२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या दमदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीवरही सर्वांच्या नजरा असणार आहेत.

४. मिचेल स्टार्क
मिचेल स्टार्क आयपीएल २०१८ हंगामात केकेआरचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे तो एकही सामना खेळला नव्हता. पण आयपीएल २०२४ मध्ये केकेआरने त्याच्यावर मोठी रक्कम खर्च केली आणि त्याला आपल्या संघात समाविष्ट केले.

५. रहमानुल्ला गुरबाज
गुरबाजने गेल्या मोसमात केकेआरकडून खेळताना अप्रतिम कामगिरी केली होती. गेल्या वर्षभरात त्याने अफगाणिस्तानसाठी चमकदार कामगिरी केली आहे. गुरबाज हा एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि तो आयपीएल २०२४ मध्ये केकेआरसाठी चमकदार कामगिरी करू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR