36.3 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजन‘जवान’ चा येणार सिक्वेल

‘जवान’ चा येणार सिक्वेल

मुंबई : गेले वर्ष बॉक्स ऑफिससाठी खूप चांगले होते. एकामागून एक अनेक चित्रपटांनी तिकिट खिडकीवर भरघोस कमाई केली. त्यात बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या पठाण, जवान आणि डंकी या तीन चित्रपटांचाही समावेश आहे. या तीन चित्रपटांमध्ये दक्षिणेतील दिग्दर्शक अ‍ॅटलीने दिग्दर्शित केलेला ‘जवान’ हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत होता. जगभरातील प्रेक्षकांना या चित्रपटाला डोक्यावर घेतले.

परिणामी या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले. शाहरूख आणि अ‍ॅटली या जोडीने पहिल्यांदाच एकत्र येऊन एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट बनवला तो तुफान गाजला. प्रेक्षक आता या चित्रपटाच्या दुस-या भागाची वाट पाहत आहेत, ज्याबद्दल दिग्दर्शक अ‍ॅटली यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘जवान’च्या दुस-या भागाबद्दल एका मुलाखतीत अ‍ॅटलीला विचारले असता तो म्हणाला की, मला खात्री आहे ‘जवान’चा सिक्वेल येईल, मी चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी काहीतरी लिहित आहे. मला चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यास नेहमीच मजा येते. मला वेगळ्या कृतीने प्रेक्षकांना चकित करायचे आहे, बघूया माझ्याकडे प्रेक्षकांसाठी कोणते सरप्राईज आहे. अ‍ॅटलीच्या या वक्तव्यावरून अ‍ॅटली ‘जवान २’ चे चाहत्यांना सरप्राईज देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान अ‍ॅटलीने शाहरूखसोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला. अ‍ॅटली म्हणतो की, शाहरूखसोबत काम करणे खूप छान होते, तो खूप मजेदार माणूस आहे. त्याला चित्रपट कसा बनवायचा हे देखील चांगले ठाऊक आहे. शाहरूख माझ्यासाठी सिनेमाचे बायबल आहे, अशा शब्दांत अ‍ॅटलीने शाहरूखचे कौतुक केले.

सध्या अ‍ॅटली ‘व्हीडी १८’ वर करत आहे काम
अ‍ॅटली म्हणाला की, भविष्यात आम्ही एकत्र काम करू, पण कधी आणि कसे करणार हे सर्व शाहरूख सरांच्या हातात आहे. अ‍ॅटली सध्या वरुण धवनसोबत ‘व्हीडी १८’ वर काम करत आहे. मुराद खेतानी यांच्या सहकार्याने अ‍ॅटली हा चित्रपट बनवत आहेत. विशेष म्हणजे वरुणचा अ‍ॅटलीसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून कीर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, तर वामिका गब्बी देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR