18.3 C
Latur
Sunday, November 17, 2024
Homeमहाराष्ट्रबायकोची नव-याला धमकी; जाहिरातीवर आयोगाचा आक्षेप

बायकोची नव-याला धमकी; जाहिरातीवर आयोगाचा आक्षेप

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीव्हीवरील जाहिरात ‘आता घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार’ यावर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने आक्षेप नोंदवला. राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहिरातीतील काही संदर्भांवर आक्षेप घेतला असून जाहिरातीच्या मंजुरीसाठी ठराविक भाग काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राष्ट्रवादीने राज्यस्तरीय प्रमाणीकरण समितीसमोर निवडणूक प्रचारासाठी आपल्या टीव्ही जाहिरातीच्या पूर्व-प्रमाणीकरणासाठी अर्ज केला होता. राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी व्हीडीओ जाहिरातीमध्ये दिलेल्या काही भागावर आक्षेप घेतला आहे.

अजित पवार गटाच्या जाहिरातीमध्ये, एक पत्नी आपल्या पतीला विनोदाने म्हणते, आता तुम्हीही राष्ट्रवादीला मत द्या, नाहीतर आज रात्री मी तुम्हाला खायला देणार नाही. एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळे कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. पोल बॉडीने जाहिरातीतील संभाषण ‘पत्नीकडून नव-याला दिलेली धमकी’ असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे आणि पक्षाला जाहिरात प्रसारित करण्यासाठी हा भाग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR