सोलापूर: सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी सकाळी प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली. न्यायालयाला धमकीचा ई-मेल मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून संपूर्ण न्यायालय परिसर निर्मनुष्य करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. न्यायालयातील न्यायाधीश, वकील आणि सर्व पक्षकारांना सुरक्षिततेच्या कारणास्तव न्यायालयाबाहेर काढण्यात आले आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, परिसराची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धमकीचा ई-मेल नेमका कोठून आला, याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाला धमकीचा ईमेल आला. न्यायालय बॉम्बने उडवून द्यायचा उल्लेख त्यात आहे. कोर्टाला ई-मेल प्राप्त होताच जिल्हा आणि सत्र न्यायालयात वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. त्यानंतर, संपूर्ण न्यायालय परिसर निर्मनुष्य करण्याचे काम पोलिसांनी केले. कोर्टातील न्यायाधीश, वकील आणि सर्व पक्षकारांना कोर्टाच्या बाहेर काढण्यात आले.
















