त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगीसह अनेक देवस्थानांना धमकीचा ईमेल;मंदिरांच्या सुरक्षेत वाढ, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर

मुंबई : प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या सणात राज्यातील काही प्रमुख देवस्थानांना नुकसान पोहोचविण्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. नाशिकमधील र्त्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी या दोन महत्वाच्या देवस्थानांना धमकीचा ईमेल प्राप्त झाला आहे. या ईमेलमध्ये मंदिरांना नुकसान पोहोचवण्याची गंभीर धमकी देण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर व सप्तशृंगी ही दोन्ही मंदिरे महाराष्ट्रातील प्रमुख आणि अत्यंत श्रद्धेची असल्याने येथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे या घटनेला गांभीर्याने घेतले जात आहे.
या धमकीच्या ईमेलनंतर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंग गड, त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच शहरातील काळाराम मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी हा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. नाशिकचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनीही धमकीच्या ई-मेलला दुजोरा दिला आहे.

मागच्या आठवड्यात नाशिकसह राज्यातील अनेक न्यायालयांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते. त्यानंतर आता अज्ञात व्यक्तींनी प्रमुख देवस्थानांना लक्ष्य केल्याने पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त वाढविला आहे. त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी या दोन्ही देवस्थानांच्या परिसरासह संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. पोलीस दलाने संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विशेष करुन सप्तश्रृंग गड आणि र्त्यंबकेश्वर येथे अतिरिक्त ५० ते ६० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये शस्त्रधारी पोलिसांचाही समावेश आहे. दिवाळीच्या सुट्टयांमुळे या दोन्ही देवस्थानांसह काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

त्यामुळे मंदिर परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. देवस्थानांमधील सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज वारंवार तपासले जात असून, परिसरातील संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. येणा-या-जाणा-या भाविकांच्या गर्दीवरही पोलिस लक्ष्य ठेऊन आहेत.
दरम्यान, धमकीच्या ई-मेलमधील नेमका मजकूर काय आणि तो कोणाच्या नावाने पाठविण्यात आला आहे. तसेच त्यामागील व्यक्ती कोण आहे, याबाबत पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे. भाविकांनी घाबरून जाऊ नये, पोलिस प्रशासन सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, प्राप्त ई-मेलबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदार पळवापळवीचा आरोप!
07:46
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56

Latest news