30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयमतदानदिनी शाळांना उडवून देण्याची धमकी

मतदानदिनी शाळांना उडवून देण्याची धमकी

गुजरातमधील १६ शाळा अलर्टवर रशियातून आला ईमेल, पोलिसांचे शोध सुरू

अहमदाबाद : मंगळवार दि. ७ मे रोजी तिस-या टप्प्यातील मतदान देशभरात पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर गुजरातच्या अहमदाबादमधील १६ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. यामध्ये शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ४ शाळांचा समावेश आहे.

सोमवार दि. ६ मे रोजी या शाळांना धमकीचे ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांचेही यामुळे चांगलचे धाबे दणाणले आहे. अहमदाबादचे पोलिस सहआयुक्त शरद सिंघल यांनी सांगितले की, अहमदाबाद शहरातील १२ शाळा आणि अहमदाबाद ग्रामीण भागातील ४ मतदारसंघातील शाळांना सकाळी ६ वाजता ई-मेल प्राप्त झाले. रशियन डोमेनवरुन त्यांना हे ईमेल आले आहेत. मेल.आरयू असे हे डोमेन आहे. दरम्यान, अहमदाबादचे पोलिस याच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्याचबरोबर सायबर क्राईम विभागात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

ई-मेलमध्ये काय?
ईमेलमधून शाळांना धमकी देण्यात आली होती. तुमच्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे असा मजकूर या ईमेलमध्ये आहे.

सुरक्षा रक्षक अलर्टवर
या ईमेलची गंभीर दखल घेत पोलिसांनी ज्या शाळांना हे ईमेल आले तिथे कोंबिंग ऑपरेशन राबवले. पण यामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. त्यामुळे हा धमकीचा ई-मेल म्हणजे अफवा होती हे स्पष्ट झाले आहे. असाच मिळताजुळता मजकूर असलेले ईमेल १ मे रोजी दिल्लीतील १५० शाळांना आले होते. त्यावेळीही तपासात काहीही निष्णन्न झाले नव्हते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR