22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयहरदा फटाका कारखान्याच्या मालकासह तीन आरोपींना अटक

हरदा फटाका कारखान्याच्या मालकासह तीन आरोपींना अटक

हरदा : मध्य प्रदेशातील हरदा येथे मंगळवारी सकाळी झालेल्या स्फोट प्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीर फटाका कारखाना चालविणारे मालक राजेश अग्रवाल आणि सोमेश अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींना अटक केली आहे. अटकेच्या भीतीने दोन्ही कारखानदार हरदामधून बाहेर पडून राष्ट्रीय महामार्गावरून पळ काडत होते, मात्र, याचवेळी त्यांना राजगड जिल्ह्यातील सारंगपूरजवळ पोलिसांनी पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालक राजेश अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफिक खान या आरोपींना पकडले असून, यांच्यावर हरदा येथील सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस तिन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहे. हरदा येथील मगरधा रोडवर उभारलेल्या बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी झालेल्या स्फोटामुळे ११ जण ठार तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर कारखानदार राजेश अग्रवाल आणि सोमेश अग्रवाल हे घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळ्या असून आरोपींवर स्फोटक कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पाठलाग करुन घेतले ताब्यात
हरदा पोलिसांना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीला जोडणा-या राष्ट्रीय महामार्गावरून आरोपींचे लोकेशन मिळाले असतानाच आरोपी उज्जैनमार्गे पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी त्यांची माहिती देणारी यंत्रणा कामाला लावली व उज्जैनजवळील माकसी येथे छापा टाकला. मात्र दोन्ही आरोपी तेथून पळून गेले होते, यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि राजगड जिल्ह्यातील सारंगपूरजवळ महामार्गावर आरोपींना पकडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR