17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeहिंगोलीभरधाव कारने तिघांना उडवले; २ ठार

भरधाव कारने तिघांना उडवले; २ ठार

हिंगोली : हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव पाटीजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीस नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

पुसेगाव येथील गौतम धाबे, शेख सत्तार आणि बबन धाबे हे पुसेगाव पाटीवरील एका ढाब्यावर वेटर म्हणून कामाला होते. रोजच्याप्रमाणे तिघे आपले काम संपवून रविवारी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले होते. याचदरम्यान सेनगावकडून हिंगोलीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणा-या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

त्यानंतर दुचाकीला चारचाकी गाडीने फरफटत पाचशे मीटरपर्यंत नेले. त्यामध्ये दुचाकीवरील गौतम धाबे (वय ४८) आणि शेख सत्तार (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बबन धाबे हे गंभीर असल्यामुळे त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती कळताच नरसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत कुणावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिस चारचाकी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.

वेगाला आवर बसणे गरजेचे…
मागच्या काही दिवसांपासून अति वेगाने वाहने चालविण्याची स्पर्धा लागली आहे. उपप्रादेशिक विभागाने वेगाने जाणा-या वाहनांवर वेळीच कारवाई करावी व वाहनाचा वेग कमी करण्यास भाग पाडावे, अशी मागणी पुढे येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR