28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजन‘टायगर ३’ एकाच वेळी ८९०० स्क्रीनवर रिलीज

‘टायगर ३’ एकाच वेळी ८९०० स्क्रीनवर रिलीज

मुंबई : सलमान खान स्टारर चित्रपट ‘टायगर ३’ रिलीज झाला आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून प्रेक्षकांकडून मिळणा-या प्रतिक्रिया अद्भूत आहेत. ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता ‘टायगर’ फ्रेंचायजीचा तिसरा चित्रपटदेखील रिलीज करण्यात आला आहे.

आता ‘टायगर ३’ बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन करेल आणि ‘पठाण’, ‘गदर’ चे रेकॉर्ड तोडणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गत स्पाय युनिव्हर्सच्या ‘टायगर’ फ्रेंचायजीचा तिसरा चित्रपट ‘टायगर -३’ ला दिवाळीचे औचित्य साधून १२ नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात आला आहे.

चित्रपटाला जगभरात ८९०० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आले आहे. भारतात ५५०० स्क्रीन्स मिळाले आहेत. शाहरूख खानचा ‘पठाण’ ७७०० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला होता. रिपोर्टस्मध्ये म्हटले जात आहे की, सलमान खानचा चित्रपट शाहरूखच्या ‘पठाण’ला पहिल्या दिवसाच्या कमाईबाबतीत मागे टाकू शकणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR