21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार मराठा की ओबीसी?, शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल

शरद पवार मराठा की ओबीसी?, शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल

पुणे : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जोरदार आंदोलने सुरू आहेत. दोन्ही समाज आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावे, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यावर सर्वच राजकीय पक्षांचे एकमत आहे. मात्र, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वेगळ्याच प्रकारे ट्रोल केले जात आहे. काहींच्या मते शरद पवार हे ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या मागे आहेत. तर काहींच्या मते मराठा आंदोलनाचे सूत्रधार शरद पवार हेच आहेत. हा आरोप सुरू असतानाच शरद पवार यांच्या शाळेचा दाखला व्हायरल केला जात आहे. त्यावर पवारांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल होत आहे. त्यावर शरद पवार यांची जात मराठा नोंदवण्यात आली आहे. पण शरद पवार यांनी ओबीसींचे सर्टिफिकेट घेतल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत होता. त्यामुळे शरद पवार हे ओबीसी झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, शरद पवार यांचे समर्थक विकास पासलकर यांनी पवार यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला दाखवत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांनी ओबीसींचे सर्टिफिकेट घेतले नसल्याचा दावाही विकास पासलकर यांनी केला आहे.

शरद पवारांचे बारामतीत शिक्षण झाले आहे. एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जाते. या षडयंत्रकारी लोकांना कोणी तरी रसद पुरवते. हा षडयंत्राचा भाग आहे. कित्येक वर्षांपासून हे सुरू आहे. सामाजिक विषय येतो तेव्हा खोलात जाऊन शोधावे लागते. त्यामुळे पवार साहेबांच्या शाळेच्या दाखल्यावर काय लिहिले आहे ते तुम्हीच पाहा. हा घ्या पुरावा. पवार मराठा असल्याचा हा धडधडीत पुरावा आहे. एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्याचं व्हिटॅमिन कुठून येतं? नागपूर सेंटरकडूनच हे व्हिटॅमिन पुरवले जात आहे, असा आरोप विकास पासलकर यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR