मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसह बीसीसीआयने वनडे मालिकेसाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. तिलक वर्माच्या नृत्वाखाली भारतीय ‘अ’ संघ दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी मैदानात उतरेल. या वनडे मालिकत ऋतुराज गायकवाड याच्याकडे उप कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय अभिषेक शर्मासह अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णाही या मालिकेत धमक दाखवताना दिसतील.
तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात ईशान किशन आणि रियान परागसह आयुष बडोनी निशांत सिंधु, विपराज निगम, मानव सुथार आणि प्रभसिमरन सिंग या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारत ‘अ’ संघात कॅप्टन आणि अनकॅप्ड खेळाडूंचे संतुलन पाहायला मिळते. प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेट किपर बॅटरच्या रुपात ईशान किशन आणि प्रभसिमरन सिंग यांच्यात तगडी फाईट असेल. दोघेही स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत ‘अ’ संघ
तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कप्तान), अभिषेक शर्मा, रियान पराग, ईशान किशन (विकेटकीपर), आयुष बडोनी, निशांत सिंधु, विपराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर).

