22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयकॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरला वाहिली श्रध्दांजली

कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरला वाहिली श्रध्दांजली

नवी दिल्ली : कॅनडाच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खलिस्तानी दहशतवादी गुरदीप सिंग निज्जर यालाकाल श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) प्रमुख निज्जर यांच्या हत्येला १८ जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. यावेळी सभागृहात १ मिनिट मौन पाळण्यात आले. या घटनेमुळे दहशतवाद्यांबाबत कॅनडाचा सहानुभूती असलेला चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

१८ जून २०२३ रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील सरे येथील गुरुद्वाराबाहेर हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

निज्जरच्या हत्येप्रकरणी करण ब्रार, अमनदीप सिंग, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग यांच्यासह चार भारतीय नागरिकांना अटक केले आहे. तर भारत सरकारने निज्जर आणि इतर ४० जणांचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत केला आहे. निज्जर यांच्या निधनामुळे भारत आणि कॅनडामधील द्विपक्षीय संबंध चांगलेच ताणले गेले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR