सोलापूरात तिहेरी हत्याकांड

सोलापूर : शहर प्रतिनिधी
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.आईला वाचवायला गेलेल्या मुलांचाही क्रूरपणे अंत करण्यात आला. संपत्तीच्या वादातून ही हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळ तात्काळ ताब्यात घेत परिसराला बॅरिकेडिंग करून बंदोबस्त वाढविला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत महिला व दिराचे शेतीच्या वादातून सतत भांडण होत होते. मागील काही दिवसांपासून शेतीचा वाद विकोपाला गेला होता, त्यामुळे मारहाण व शिवीगाळीसारखे प्रकार सातत्याने होत होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास दिराने रागाच्या भरात भावजय व दोन पुतण्यांचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे हे घटनास्थळी दाखल झाले असून बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.या घटनेत जीव गमावलेले प्रिया ही बारावी शिक्षण घेत होते तर शिवराया हा दहावीचा विद्यार्थी होता दोघांच्याही बोर्डाच्या परीक्षा दिल्या होत्या. एका हसत खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवांत झाल्याने बोरामणी ग्रामस्थांनी हळूहळू व्यक्त केली आहे.
बोरामणी येथील मस्के कुटुंबाची सलग तीन घरे असून मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची बारावीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी प्रिया मस्के (वय १८) आणि दहावीत शिकणारा मुलगा शिवराय मस्के (वय १६) हे तिघेजण राहत होते. गुरुवारी रात्री उष्म्यामुळे तिघेही घराच्या गच्चीवर झोपले होते. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने घराच्या गच्चीवर प्रवेश करून अचानक तलवारीने सपासप वार केल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावक-यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

मुलांना देखील सोडले नाही
या हल्ल्यात गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया यांचा गच्चीवरच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला शिवराय जीव वाचविण्यासाठी खाली बैठकीच्या खोलीत धावत आला असावा, मात्र तेथेच त्याचाही रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
या तिहेरी हत्याकांडाने केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच ऐरणीवर आला नाही तर प्रॉपर्टीचा वाद किती टोकाला जाऊ शकतो याचे दाहक वास्तव समोर आले आहे सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून मालमत्तेचा वाद हे मुख्य कारण असावे असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे आरोपीच्या शोधासाठी पतके रवाना करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले आहे.

प्रॉपर्टीच्या वादातून हत्या केल्याचा संशय
घटनेची माहिती मिळतात सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे. घराण्यातील किंवा परिचयातलीच व्यक्तीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news