समृद्धीवर ट्रकने ६ महिला मजुरांना चिरडले

जालना : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज बुधवार दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. जालन्यातील कडवंची शिवारात हा भीषण अपघात झाला असून, या अपघातात ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईच्या दिशेने वेगाने जाणा-या ट्रकने महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की काही महिला मजूर ट्रकखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी हाहाकार माजला होता. अपघाताची माहिती मिळताच तालुका जालना पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांनीही तत्परता दाखवत मदतकार्य हाती घेतले आणि जखमींना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला.

लेकरांचा मन हेलावणारा आक्रोश
या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर काम करणा-या मजुरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या अपघाताबाबत अधिकृत माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून मृतांचा आकडा आणि ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेवर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अपघाताचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांपैकी कुणी रुग्णालयात पोहोचले तर कुणी अपघातस्थळी पोहोचले. तिथले दृश्य पाहून लेकरांनी एकच आक्रोश केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news