25.2 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeअंतरराष्ट्रीयट्रम्प यांचा २० जानेवारीला शपथविधी

ट्रम्प यांचा २० जानेवारीला शपथविधी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी २०१९ मध्ये तेथील निवडणूक काळात हाऊडी मोदी, नमस्ते ट्रम्प असे दोन गाजलेले, मोठाले कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले होते. या काळात ट्रम्प आणि मोदी यांची दोस्ती जगाने पाहिली होती. आता पुन्हा ट्रम्प सत्तेत येत आहेत. येत्या २० जानेवारीला ट्रम्प यांचा शपथविधी होत आहे. याचे निमंत्रण अमेरिकेने भारताला पाठविले आहे.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नसून त्यांच्याऐवजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहभागी होणार आहेत. ट्रम्प यांच्यासोबतच उपराष्ट्रपति जेडी वेंस यांचाही शपथविधी होणार आहे. ४७ वे राष्ट्रपती म्हणून ट्रम्प थपथ घेणार आहेत. ट्रम्प हे दुस-यांदा राष्टपती होत आहेत. २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. जयशंकर या दौ-यात ट्रम्प सरकारच्या अधिका-यांशीही बैठका करणार आहेत.

अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीनंतर अनेक देश अमेरिकेबद्दल चिंतेत आहेत, परंतु भारत त्या देशांमध्ये नाही. ट्रम्प यांना केलेल्या पहिल्या तीन फोन कॉलमध्ये पंतप्रधान मोदींचाही समावेश होता, असे जयशंकर म्हणाले होते. ६ जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प जिंकल्याची घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या सर्वोच्च सभागृहात राज्यांची संख्या जाहीर करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांना ३१२ इलेक्टोरल मते मिळाली, तर कमला हॅरिस यांना २२६ मते मिळाली. सोमवारी प्रमाणन प्रक्रियेदरम्यान एकूण मतांची पुष्टी करण्यात आली. हा या निवडणुकीचा शेवटचा टप्पा होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR