वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच शपथ घेतली. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या अनेक व्यक्तींवर विश्वास दाखवला आहे. त्याच दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या टीममध्ये आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी आता भारतीय-अमेरिकन माजी पत्रकार कुश देसाई यांची उप प्रेस सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. व्हाईट हाऊसतर्फे ही घोषणा केली आहे.
देसाई यांनी यापूर्वी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनसाठी उपसंचार संचालक आणि आयोवा रिपब्लिकन पक्षाचे संप्रेषण संचालक म्हणून काम केले आहे. रिपब्लिकन नॅशनल कमिटीमध्ये ते डेप्युटी बॅटलग्राउंड स्टेट्स आणि पेनसिल्व्हेनिया कम्युनिकेशन डायरेक्टर देखील होते. या पदावर असताना त्यांनी मुख्य बॅटलग्राऊंड स्टेट्समध्ये(राज्यांमध्ये) विशेषत: पेनसिल्व्हेनिया येथे मध्ये मैसेजिंग आणि नॅरेटिव्ह सेट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रम्प यांनी बॅटलग्राऊंडमधील सर्व सात राज्यांत विजय मिळवला.
दरम्यान यापूर्वी ट्रम्प यांनी स्टीव्हन च्युंग यांची सचिव आणि व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय कॅरोलिन लेविट यांची सचिव आणि प्रेस सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. व्हाईट हाऊस कम्युनिकेशन्स ऑफिसची देखरेख हे व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ आणि कॅबिनेट सचिव टेलर बुडोविच करतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ही त्यांची दुसरी टर्म आहे. ते २०१६-२० पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष होते. सत्तेवर येताच ट्रम्प यांनी अनेक मोठे आणि कठोर निर्णय घेतले.
ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये कोणा कोणाचा समावेश ?
काश पटेल
ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या काश पटेल यांची अमेरिकेचे नवे एफबीआय प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
विवेक रामास्वामी
ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांची नवीन शासकीय कार्यक्षमता विभागासाठी निवड केली आहे. सरकारला सल्ला देण्याचे कार्य रामास्वामी हे करतील.
जय भट्टाचार्य
जय भट्टाचार्य यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक म्हणून ट्रम्प यांनी नियुक्ती केली आहे.
तुलसी गबार्ड
तुलसी गबार्ड यांची राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी ट्रम्प यांनी नियुक्ती केली आहे. त्यांनी अलीकडेच डेमोक्रॅटिक पक्ष सोडून रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता.
हरमीत के धिल्लन
ट्रम्प यांनी न्याय विभागातील नागरी हक्कांसाठी असिस्टंट अॅटर्नी जनरल म्हणून ढिल्लन यांची नियुक्ती केली.