31.6 C
Latur
Sunday, January 26, 2025
Homeधाराशिवतुळजाभवानी मंदिर पहाटे १ वाजेपासून दर्शनासाठी खुले

तुळजाभवानी मंदिर पहाटे १ वाजेपासून दर्शनासाठी खुले

सुट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय;

धाराशिव : शनिवार, रविवार आणि त्यात सोमवारी नाताळ सणाची सुटी असल्याने अनेकजण सुटीचे नियोजन करत असतात. त्यातल्या त्यात महत्त्वाच्या मंदिरात या काळात भाविकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळत असते.

दरम्यान, याच सुट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिर पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन भाविकांना दर्शनार्थ खुले करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

सुट्यांच्या काळात दरवर्षी तुळजाभवानी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे मंदिर प्रशासनाला देखील मोठी कसरत करावी लागते. या काळात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण येऊन भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन घडवण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. रांगेतून आलेल्या भाविकांना श्री तुळजाभवानी मूर्तीचे सुलभ मुखदर्शन घडविण्यासाठी नाताळ सुटीनिमित्त मोठी गर्दी होते. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने २५ डिसेंबर रोजीचे चरणतीर्थ पहाटे एक वाजता होईल, असे स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR