27.3 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईची तुंबई; दानवे संतापले

मुंबईची तुंबई; दानवे संतापले

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या तीन ते चार तासात मुंबईत ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसाने मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून विविध सखल भागात पाणी साचल्याने मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईतील पावसाचा लोकलवरदेखील परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेही उशिराने धावत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. यामुळे एकीकडे मुंबईकरांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. तर आता विरोधक सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असून अंबादास दानवे यांनी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र डागले आहे. मुंबईतील अवस्थेवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मुंबईत पाऊस येणे हे अचानक झालेलं नाही. यातून पावसाळ्यापूर्वी काम झालेले नाही हे सिद्ध होत आहे. आदित्य ठाकरे जोपर्यंत होते, तोपर्यंत मुंबईत बारकाईने लक्ष देत होते. मात्र आता मुंबईला कोणी वाली राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी यावेळी सरकारवर केली आहे.

अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
वरळीत शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने आपल्या भरधाव महागड्या बीएमडब्ल्यू कारने हिलेला चिरडले आणि तिथून फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याला ताब्यात घेतले आहे. मात्र उपनेत्याचा मुलगा अद्याप फरार आहे. यावरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा मुलगा हा मद्यपान करून महिलेला घडक देतो, फरफटत नेतो. सर्वसामान्य माणसाचा जीव कसा घेता येतो,याचं हे उत्तम उदाहरण आहे. मुख्यमंत्री भल्याभल्यांची विकेट घेतात, मात्र एवढी यंत्रणा असून आरोपीला पकडू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR