23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeपरभणीपरभणी शहरात बनावट नोटा बनविणा-या दोघांना अटक

परभणी शहरात बनावट नोटा बनविणा-या दोघांना अटक

परभणी : भारतीय चलनातील बनावट नोटा बनविण्याच्या साहित्यासह दोघांना दि. १५ सायंकाळी ७ च्या सुमारास पोलिसांनी अटक केली. आरोपींजवळून बनावट नोटा, प्रिंटर, नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १५ हजार ७४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवा मोंढा पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले होते. संबंधित दोघेजण स्टेशन रोडवरील शाही मस्जिद जवळ किरायाच्या खोलीमध्ये राहत होते. त्यांच्याजवळ लॅपटॉप, मोबाईल होता. लॅपटॉपमध्ये भारतीय चलनातील २०० रुपये किंमतीचे फोटो, नकली नोटा कशा बनवायच्या याबाबत व्हीडीओ होते. पोलिसांनी संबंधित दोघांना नानलपेठ पोलीसांच्या स्वाधीन केले.

त्यानंतर दोन्ही आरोपींची चौकशी करत ते राहत असलेल्या ठिकाणी पोलीस गेले. या ठिकाणची तपासणी केली असता तेथे नोटा तयार करण्यासाठी लागणारे बॉन्ड पेपर, शाई, प्रिंटर, काही बनावट नोटा असे साहित्य सापडले. या प्रकरणात पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR