27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशकात दोघांना स्वाईन फ्लूची लागण

नाशकात दोघांना स्वाईन फ्लूची लागण

नाशिक : स्वाईन फ्लूने सिन्नर तालुक्यातील दातली गावातील महिलेचा मृत्यू झाला असून शहरातील दोघांना लागण झाली आहे. यामुळे मनपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून स्वाईन फ्लू संशयित रुगणांचा शोध घेतला जात आहे. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहे.

गेल्यावर्षी शहरात डेंगूने थैमान घातले होते. परंतु सद्यस्थितीत स्वाईन फ्लूच्या रूपाने शहरवासीयांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. शहरात सोमवारी तापमानाने चाळीशी पार केली. त्यामुळे तापाचे रुग्ण वाढत आहे. शहरात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले आहे. त्यात एका महिलेचा व पुरुषाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांचा अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दोघाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या रुग्णांच्या संपरकातील रुगणाचे स्वब घेण्यात आले आहेत. सिन्नर येथील दातलीतील ६३ वर्षीय महिलेचा शहरातील खासगी रुग्णालयात मृत्य झाला. सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

शहरातील दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून दोघांची प्रकृती उत्तम आहे. दातलीच्या महिलेचा मृत्यू झाला असून नागरिकांनी घाबरून न जाता रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR